आमच्याबद्दल


      आज संपूर्ण जग विज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघत आहे, मानवी जीवन दिवसेंदिवस अनेक सुविद्य सुविधांनी समृद्ध होत आहे, त्याच मानवी संसाधनाची ऊर्जा कल्याणकारी विधायक मार्गाने वापरण्यासाठी जेतवन महाबुद्ध विहाराच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या सर्व संचालक मंडळाने " सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्य उपसंपदा ! सचित परियोदपनं, एतं बुद्धानं सासन ! "

      या सारगर्भीत तत्त्वाचा अंगिकार केला आहे, तथागत बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी मांडलेल्या विज्ञानवादी तत्वप्रणालीचा स्वीकार आणि अनुसरण करत, आधुनिक विज्ञान हे बौद्ध तत्त्वज्ञानातील अनित्यता आणि अनात्मव वादाच्या सिद्धांताचे असल्याने, त्या सिद्धांताचा प्रचार प्रसार करण्याचे ध्येय आम्ही बाळगून आहोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला, ' मुक्ती कोन पथे ' या महावाक्यातून बुद्धाच्या समतावादी विचाराकडे नेले, आपल्या मृत्यूपर्यंत समतावादी बौद्ध परंपरेच्या सभ्यतेची याची शिकवण दिली... बौद्ध सभ्यतेची केंद्र उभी करण्याची प्रेरणा दिली त्याच प्रेरणेतून साकारत असलेल्या महाबुद्ध विहारा जवळील जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चौदा फुटी भव्य पुतळा उभारण्याचे काम देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाउंडेशनच्या संचालक मंडळाने हाती घेतलेला आहे. हा भव्य पुतळा " विहाराकडे चला " असा अंगुलीनिर्देश करणारा असणार आहे...

     नंदुरबार येथील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाउंडेशन अंतर्गत “जेतवन महाबुद्ध विहाराची निर्मिती जोरात सुरू आहे. निर्माणाधीन कार्य लवकरच पूर्णत्वास येऊन भव्य अशा महाविहाराचे दालन या नंदुरबार जिल्ह्यातील बुद्ध विचारांना मानणाऱ्या प्रबुद्धनागरिकांसाठी खुले होणार आहे. 20 हजार स्क्वेअर फूट जागेत निर्माण होत असलेले” महाबुद्ध विहाराच्या अंतर्गत

 • बहुद्देशीय केंद्रीय इमारत
 • विपश्यना सभागृह
 • भव्य विनय प्रशिक्षण सभागृह
 • भिक्षू विश्रामगृह
 • भव्य बौद्ध साहित्य ग्रंथालय
 • पाली भाषा शिक्षा केंद्र
 • बौद्ध सभ्यता संशोधन केंद्र
 • वाचनकक्ष
 • भोजनगृह
 • प्रशासकीय कार्यालय
 • यात्रेकरू निवास कक्ष

अध्यक्ष बद्दल© 2021 All rights reserved. | Disclaimer | Privacy Policy